गौरी काटे - परिचय


 

Amit Kateसौ.गौरीताई फलज्योतिषी असून आरोग्य, शिक्षण, नोकरी-व्यवसाय, विवाह, संतती,आर्थिक परिस्थिती अशा अनेक विषयांवर गेली सतरा वर्षे मार्गदर्शन करत आहेत. आध्यात्मिक मार्गदर्शन करत असल्याने वास्तूदोष असल्यास त्यावर स्त्रियांना विशेष लाभदायक उपाय त्या सांगतात.

 

लहान मुले आणि गर्भवती स्त्रियांसाठी गौरीताई ध्यानधारणा वर्ग घेतात.

 

मानसिक आजार बरा होण्यासाठी गायत्री मंत्र आणि ध्यान आणि शारीरिक आजार बरे होण्यासाठी ॐकार प्राणायाम त्या शिकवितात. आजतागायत खूप लोकांना त्याचा लाभ झालेला आहे.

 

गौरीताईंनी मानसशास्त्राचा अभ्यास केला असून त्या परामनासशास्त्राचाही अभ्यास करत आहेत. आयुर्वेद, वनौषधी, जलचिकित्सा आणि रंगशास्त्र यांचाही अभ्यास असल्याने आवश्यकतेनुसार तसे विनामूल्य मार्गदर्शन करतात.

 

गौरीताई कुटूंब समुपदेशिका असून कौटुंबिक समस्या विशेषतः स्त्री आणि मुलांच्या समस्या समुपदेशनाद्वारे त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन करतात.

 

मुळचेच लेखन आणि काव्य यांची आवड असल्याने आणि स्वाभाविक बैठक आध्यात्मिक असल्याने त्यांनी तेजोगमन, वाटाड्या, या ईश्वरीय शक्ती अभिप्रेत करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांची इतर पुस्तकेही आहेत.पैकी आध्यात्मिक गर्भसंस्कार आणि जोपासना हे पुस्तक वाचकांना खूप आवडले आहे.(सर्व पुस्तके आपण याच वेबसाईटवर पाहू शकता.)क्लिक करा

 

गौरी ताईंनी त्यांच्या कार्यालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ, पुस्तके, धार्मिक ग्रंथ ठेवले असून लोकांना त्यांचा लाभ घेता येतो. नोट्स काढता येतात. या कार्यालयात साईस्थान असून इथे कुणीही पैसे दक्षिणा अर्पण न करता इथे बसून साई नामाचा जप करावा आणि धार्मिक ग्रंथ वाचावेत यावर गौरीताईंची विशेष कटाक्ष आसतो.

 

तिथे इतरही शेकडो पुस्तके वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. कुठेही गेले असता गौरी ताई तेथील पुस्तक प्रदर्शनआणि विक्री केंद्राला आवर्जून भेट देतात आणि वाचकांना लाभ घेता येईल, तरुण पिढीला माहिती मिळेल अशी अनेक पुस्तके घेऊन येतात. गौरीताईंचे स्वतःच्या अभ्यासाचे अनेक लेख-लिखाण विविध मासिकात छापून येत असतेच.