वास्तुशास्त्र मार्गदर्शन :-
वास्तुशास्त्र म्हणजे काय ?
सर्व ग्रहांप्रमाने पृथ्वीच्या भोवतीसुद्धा विद्युत चुंबकीय ऊर्जेचे एक क्षेत्र आहे. वातावरणातील या ऊर्जेशी संपर्क आल्यामुळे होकायंत्रातील सुई उत्तरदिशेला स्थिर राहते. आपल्या मनावरती व शरीरावरती या ऊर्जेचा सतत परिणाम होत राहतो. मनुष्यप्राणी या ना त्या कारणाने कोणत्या ना कोणत्या वास्तूमध्ये वास्तव्य करुन असतो. राहते घर, कार्यालयाचे ठिकाण, व्यवसायाची वास्तु, संस्था इ. अनेक वास्तूंमध्ये आपण वावरतो. वातावरणातील विद्युत चुंबकीय शक्ती आपल्या देहापर्यंत पोचत असताना भोवतालच्या वास्तूच्या माध्यमातून येते. अशावेळी वास्तु निसर्गाशी योग्य संतूलन साधणारी असल्यास मन, शरीर, विचार, कार्य, वर्तन सारेच सुयोग्य पद्धतीने पार पडते. मात्र तसे नसल्यास या गोष्टींमध्ये त्रास होतो. यासाठीच वास्तूची रचना कशी असावी हे सांगणारे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र होय.
राहाते घर किंवा व्यवसायाचे ठिकाण शास्त्रानुसार नसल्यास कोणत्या समस्या निर्माण होतात?
वरील नियमांप्रमाणे मन, शरीर, विचार, कार्य, वर्तन, यावरती वास्तू परीणाम करते. जर वास्तूमध्ये दोष असेल तर त्याचा परीणाम यश, आरोग्य, पैसा, प्रतिष्ठा, मन:शांती यावरही होतो. आरोग्य बिघडणे, वैद्यकीय उपाय करूनही त्याचा प्रभाव न पडणे, अपेक्षित यश न मिळणे, कष्ट वाया जाणे, त्यामुळे आर्थिक विवंचाना, घरातील लोकांनमध्ये संघर्ष आणि वादविवाद, आरोग्यामुळे संतती आणि वंशवृध्दीच्या समस्या घडणे अशा अनेक समस्या उद्भवतात.
दोषयूक्त वास्तु म्हणजे काय ?
वास्तूदोष कसा व का घडतो ?
वास्तूदोषाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे रचना चुकल्याने घडणारे दोष व दुसरे म्हणजे चुकीच्या वर्तनामूळे, दुषित व्यक्तींच्या वास्तव्यामूळे घडलेले दोष. असे दोष असणार्या वास्तूंना आपण दोषयूक्त वास्तू किंवा दोषयूक्त ठिकाणे म्हणतो. तामसी, घातक प्रवृत्ती असणार्या व्यक्तींच्या वास्तव्यामुळे जशी वास्तू / जागा दूषित बनते त्याचप्रमाणे नैराश्य, आजार, अपयश, कर्ज, नास्तिकता, व्यसने, आत्मघातकी वृत्ती अशा मानसिक स्थितींमधून गेलेल्या व्यक्तींच्या वास्तव्यामुळे सुद्धा वास्तू दुषित बनते. एखाद्या वास्तूच्या भोवती समाधी, स्मशान, मंदिर, उकीरडा अशा तीव्र स्वरूपाची चांगली/वाईट ठिकाणे आल्या कारणांनी जागा व वास्तू दोषात्मक बनतात.
कोणत्याही स्वरूपाचे वास्तूदोष समूळ दूर करता येतात. श्रद्धा व सबुरी मात्र हवी.
रहाताना, बांधकाम करताना, बांधकाम तोडताना आणि वाढीव बांधकाम तसेच पूनर्नुतनीकरण करताना; अशा वास्तूंविषयी काम करताना सावधपणे, जागरूकतेने व वास्तुशास्त्राचे नियम पाळून कामे करावी लागतात.
अशा जागांवर जाताच आम्हाला हे दोष दिसतात व जाणवतातही. काही सोपे उपाय आणि दैवी उपासनेद्वारे कार्यसिद्धी होते आणि दोषसूद्धा दूर होतात.
एका कुटुंबाने त्यांच्या स्वत:च्या जागी स्वत:चे घर बांधण्याचा निर्णय घेतला. घर शास्त्रानुसार असावे असा विचार त्या सूज्ञ व्यक्तींनी केला व आमच्या ऑफीसला फोन करून वेळ ठरवून ते भेटायला आले. जागा तपासण्यासाठी त्यांनी आमची व्हीजिट घेतली. आम्ही जागा तपासण्यासाठी गेलो व पाहीले की जागेचा उतार, आकार आणि स्पंदने फारच अयोग्य होती. आम्ही त्यांना येथे घर बांधू नका, दुसरी जागा बघा असे सांगितले. जागेच्या अभावाने तेथेच घर बांधणे त्यांना भाग होते. दुसरा दोष म्हणजे या जागेच्या ब्रम्हस्थानावरच एक जूनी विहीर होती. बाजूला तूळस व त्याशेजारी समाधी होती. हे सर्व फार मोठे दोष होते व ही केस आमच्यासाठी चॅलेंज होती.
आम्ही वास्तुशास्त्राचे नियम, घराची उत्तम रचना, मुहुर्त आणि ईश्वरी उपासना या आधारे हे काम यशस्वीपणे पार पाडले व आज हे कुटुंब गेली चार वर्षे सुखाने वास्तव्य करीत आहे. त्यांच्या वास्तव्यातच नाही तर बांधकामातही कोणतीच अडचण न येता ते पूर्ण झाले. शास्त्राचे नियम योग्यप्रकारे पाळल्यामूळेच हे घडले.
दुसर्या एका विषयात थोडी वेगळीच समस्या होती. एका प्रथितयश बिल्डरने बिल्डींग बांधायच्या जागी असणारा भलामोठा जूना, पूजनीय पिंपळवृक्ष विधी-पूजा न करता तोडला. त्यावेळेपासून त्याच्या मागे दुर्दैवी घटनांची मालिकाच सुरू झाली. बिल्डींगचे बांधकाम तर सोडाच पण स्वत:चे कौटुंबिक जीवन उध्वस्त होण्याची चिन्हे दिसू लागली. हा माणूस नास्तिक होता पण काही दिवसांनी त्याचेही मन सांगू लागले की "आपले काहीतरी चुकले आहे!" स्वत:च्या मनाची ही खंत त्याने त्याच्या मित्राला बोलून दाखवली. त्याचा मित्र आमचे जूने क्लायंट होते. ते त्याला आमच्याकडे घेवून आले. आम्ही या व्यक्तीशी सविस्तर चर्चा करून पिंपळाचे महात्म्य समजावून सांगितले. नाईलाजाने तोडायचे असल्यास पूजाविधी सांगितला. हे ही न घडल्यास प्रायश्चित्त सांगितले. त्या व्यक्तीने प्रायश्चित्त घेईन असे सांगितले. ईश्वर दयाळू आहे. त्याने मनोभावे उपासना पूर्ण केल्याने संकटांची मालिका थांबली. नियोजीत प्रकल्प आठ-नऊ महीन्यांत पूर्ण झाला. आता ही व्यक्ती प्रत्येक जागा आम्हाला दाखवूनच घेते. हा सगळा वास्तुशास्त्राचा आणि अध्यात्माचा महिमा होय! आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत.
आपल्याही भोवती अशा अनाकलनीय घटना घडत असतात. कधी स्वप्ने, पूर्वाभास तर कधी मनातील विचारांद्वारे आपल्याला हे जाणवत असते. अंतर्मनाची शक्ती फार मोठी आहे. आपले अंतरमन आपले हितचिंतक आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घ्या. जीवनाचा प्रवास अनेक गूढ गुपिते उलगडल्याने सोपा होतो!
वास्तूदोषावर उपाय योजना कशा कराव्यात? व त्यामुळे किती दिवसात समस्या निवारण होते?
वास्तूदोषावर उपाय योजना करण्यासाठी एकतर वास्तूतज्ञाला आपल्या घरी निमंत्रित करणे उत्तम. ह्यावेळी तज्ञ स्वत:च्या नजरेने आपल्या वास्तूचे परीक्षण करतो. होकायंत्राच्या सहाय्याने वास्तुतज्ञ दिशा अचूक ठरवितो. कारण योग्य मार्गदर्शनासाठी दिषां इतकेच उपदिशांना आणि उप-उपदिशा यांनासुध्दा तितकेच महत्व आहे. यानंतर तज्ञ काही बदल व उपाय सुचवितो. याचा परिणाम एक ते सहा महिने या कालावधीच्या दरम्यान उत्तम प्रकारे दिसून येतो.
दुसरी पध्दत अशी की तज्ञाकडे आपण स्वतः आपल्या वास्तूचा नकाशा व आतील रचना असलेला प्लॅन घेऊन यावा. यामध्ये सुध्दा दिशा अचुक ठरविणे आवश्यक असते. याचाही परीणाम एक ते सहा महिन्यात उत्तम प्रकारे दिसून येतो.
वास्तुशास्त्राच्या टिप्स :-
वास्तूपरिक्षणाच्या केसस्टडीज
आम्ही सल्ला दिलेली वास्तूशास्त्राची काही उदाहरणे (केसस्टडीज) :-
"लग्न कराव पाहून; व घर पहाव बांधून" ही म्हण अगदी खरी आहे.
कित्येकदा आपल्या घरात घडणार्या काही बर्या-वाईट गोष्टी या कळत-नकळत वास्तूदोषांमुळेही होत असतात. जस मगासच्या केसस्टडीमध्ये मी आर्थिक हानीबाबत सांगीतल; अता एका आजारी प्रोफेसर मॅडमची केसस्टडी सांगणार आहे.
गोव्यातून आलेल्या एका प्रोफेसर मॅडमनी वास्तूपरीक्षणासाठी अपॉईंटमेंट घेतली. सदरहू मॅडम आजारपणाचे नेमके निदान होत नसल्याने व खूप औषधे घेऊनही त्याचा फायदा न झाल्याने आजारपणाला कंटाळल्या होत्या. अगदी आयुष्य संपवायचाही निर्धार त्यांनी केला होता.
पत्रिकेच्या सहाय्याने काही प्राथमिक उपाय देऊन नंतर सरांनी त्यांच्या वास्तूची व्हिजीट केली व त्यावरही उपाय दिले व प्रकृतीत फरक पडण्यासाठी सहा महीन्यांचा कालावधी दिला. पण आश्चर्य म्हणजे त्या मॅडमचा दुसर्या महीन्यातच फोन आला त्या इतक्या आनंदी होत्या की त्यांना ७०% पेक्षा जास्त फरक पडला होता. म्हणजे जेव्हा त्या सिरीयस असायच्या; हॉस्पिटलमध्ये असायच्या तरीदेखील त्या ५०% चांगल्या असायच्या व एरव्ही त्या ७०% बर्या असायच्या. तब्बेतीत आणखी सुधारणा होण्यासाठी त्यांना पंचकर्म चिकित्सेचाही सल्ला देण्यात आला होता व ते त्यांनी अमलात आणलाही.
आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाप्रत गेलेल्या मॅडम आता खुपच पॉझिटीव्ह व निरोगी आहेत हे सांगायलाच नको. पण हे घडल फक्त अमितसरांच्या वास्तूपरीक्षणामुळेच.
>>
अमितसरांचा वास्तूपरीक्षणाचा दांडगा अनुभव आहे. वास्तूमध्ये विनाकारण तोडफोड तसेच पिरॅमिडसारख्या यंत्राचा उपयोग करायला सरांचा विरोध आहे.
दैवी उपायांबरोबरच दिशांचे योग्य मार्गदर्शन व घरातील दोषांचे निर्मुलन होण्यासाठी घरातील स्वयंपाकघर, तिजोरी, प्रवेशद्वार, शयनगृह, सांडपाणी निर्मुलन आदी गोष्टी योग्य ठिकाणी करण्यावरच भर असतो.
रायगड जिल्यातील श्री. महाडिक यांचेकडील व्हिजीट हे अगदी बोलक उदाहरण ! श्री. महाडिक यांचा धंदा-व्यवसायात समस्या असल्याने त्यांनी अपॉईंटमेंट घेऊन सरांची व्हिजीट घेतली. महाडिक यांना धंद्यातील समस्येमुळे आर्थिक विवंचना व अन्य समस्याही उद्भवल्या होत्या. सरांनी रहात्या वास्तूचे परीक्षण करुन दोष सांगितले पण त्याबरोबरच काही उपायही दिले. वास्तूरचनेतही फेरफार सांगितले. श्री. महाडिक यांनीही उपाय केले आणि त्यांना या सगळ्याचा छान उपयोग झाला. आर्थिक विवंचनेत असलेल्या महाडिकांना केवळ ६ महिन्यांच्या आतच लक्षणिय बदल घडुन आला व एकेकाळी पैशाची भ्रांत पडलेल्या महाडिकांना आता पैसा ठेवण्यासाठी तिजोरीची आवश्यकता भासतेय असे त्यांनी कळवले.
>>
एका क्लायंटनी आम्हाला ऑफीसमध्ये भेटून सांगितले की आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलेले आहे. आमच्या घराचे तोंड पूर्वेलाच आहे. पण तरीही आम्हा पती पत्नींची सतत भांडणे होतत आणि मुलांनाही अभ्यासामध्ये म्हणावे तितके यश नाही. आम्ही घर तपासण्यासाठी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेला आढळून आले की घराची रचना पती पत्नींच्या भांडणाला पूरक होती. आग्नेयला ओपन टेरेस व त्याबाजूला दक्षिण नैॠत्येला त्यांची बेडरूम होती. मुलांची बेडरूम वायव्येला होती परंतु त्यातील सामानाचे नियोजन चुकलेले होते. आम्ही मुलांच्या अभ्यासाची व झोपण्याची दिशा बदलली. पती पत्नींच्या रूम मधील रंगसंगती बदलली. आग्नेयच्या टेरेसमध्ये काही किरकोळ बदल सुचविले. ईशान्य कोपर्यावरचा मीटर बदलून पूर्व आग्नेयला घ्यायला सांगितला. असेच काही इतर उपायही सांगितले. (पहा टीप्स) काही दिवसातच त्यांना उत्तम परिणाम आला त्यानंतर या घरातील करायचे वढीव बांधकामही त्यांनी आमच्या सल्ल्याने करून घेतले.
एका व्यक्तीने आम्हाला सांगितले की, "माझ्या ऑफीसमध्ये सहकार्यांकडून मला वारंवार त्रास होतो. आम्हा चार व्यक्तींची मिळून एक केबीन आहे." त्यानी येताना त्या केबीनची रचना एका मोठ्या कागदावर सुवाच्च्य पद्धतीने काधून आणली होती. होकायंत्राच्या सहायाने दिशाही निश्चित केलेली होती. त्या प्लॅनवरून आम्ही त्यांच्या टेबलाची रचना सरकवायला सांगितली. बसण्याची दिशा बदलली. टेबलावर इष्ट देवतेचा फोटो ठेवायला सांगितला आणि त्यांच्या जन्मकुंडलीमधील तृतीय स्थानाचा आणि षष्ठ्म स्थानाचा दोष नष्ट होईल असे उपाय दिले. (जन्मकुंडलीमधील तृतीय आणि षष्ठ्म स्थान सहकारी, नातलग, शत्रु, वादविवाद, गुप्तशत्रु याविषयी सूचक माहिती देते.)
वरील दोन्ही पद्धतीने उपाय करून त्यांना लाभ झाला. बढतीही झाली आणि या कार्यालयामध्येच त्यांना त्यांची स्वतंत्र स्वत:ची केबीन मिळाली.