अमित काटे - परिचय
वास्तुशास्त्रतज्ज्ञ श्री. अमित काटे हे आध्यात्मिक दृष्टिकोन असलेले अग्निहोत्री उपासक आहेत. त्यामुळे त्यांचे वास्तू मार्गदर्शन आणि दोष निवारणार्थ उपाय हे धार्मिक पद्धतीचे साधे सोपे आणि अत्यंत प्रभावी आहेत. अमितसर म्हणतात की वास्तुशास्त्राचा पायाच धार्मिक उपासना आहे.कारण वास्तूमधील विविध जागी विविध देवता विराजमान आहेत. पूर्वेला इंद्र आहे तर पश्चिमेला वरुण, उत्तरेला कुबेर आहे तर दक्षिणेला यम. ईशान्य दिशेला महादेव आहेत आग्येय दिशेला वास्तुदेवता आणि वायव्येस नागदेवता असून नैऋत्य दिशेला पितृदेवता आहेत.
अमित सरांची वास्तू मार्गदर्शनाची पध्दत अतिशय वेगळी आणि चपखल आहे.व्यक्तीचा स्वभाव, जीवन शैली, आवड आणि दैनंदिन जीवनातील पुजापाठासाठी मिळणारा वेळ यांची सांगड घालून ते उपाय देतात.
अमित सर म्हणतात की भिंतीवर एखादे यंत्र लावून, प्लास्टिकच्या वस्तू लावून किंवा चित्र लावून वास्तुदोष दूर होत नसतो. एखादी महागडी मुर्ती खरेदी करून ती घरात ठेवून आपोआप वास्तूदोष दूर होत नाही.वास्तूदोष दूर करण्यासाठी वेगळे काही खरेदी करायची गरज नसते. तुमच्या दैनंदिन जीवनात असणाऱ्या गोष्टीच वास्तूदोष निर्माण करतात आणि दुरही त्याच करतात.
आपला मेंदू आणि आपली वास्तू यांचा फार जवळून संबंध येतो. चुकीच्या वास्तुमुळे निर्णय चुकू शकतात तर चांगल्या वास्तुमुळे निर्णय यशस्वी होतात.यासाठी आपल्या वास्तूमधे दोष असू नयेत. असतील तर ते दूर करावेत.
आध्यात्मिक बैठक असल्याने अमित सरांचा वास्तू मार्गदर्शन करताना नियम आहे की ज्यांच्या दारू,जुगार याच्याशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरी आहे त्यांच्याकडे सर मार्गदर्शनासाठी जात नाहीत. सर म्हणतात की मी या व्यक्तींचा तिरस्कार करत नाही पण माझे उपाय त्यांना लागू पडत नाहीत. त्यामुळे उगाच माझा वेळ आणि त्यांचे पैसे का वाया घालावा? एखादी व्यक्ती व्यसनी असेल तर सरांचा उपाय लागू होईल, व्यसन सुटेल पण कुणी व्यक्ती स्वतः निर्व्यसनी आहे मात्र घरात उत्पन्न येतेय वरील व्यवसायातून तर सर जात नाहीत. अर्थातच, एखादे हॉटेल जिथे दारू विक्री होते तिथेही सर मार्गदर्शनासाठी जात नाही. हॉटेल मांसाहारी असेल तर एकवेळ चालेल पण दारू विक्री नसावी. तरच सर मार्गदर्शनासाठी येतात.
वास्तू मार्गदर्शनंतर मुख्य समस्या दूर होईपर्यंत सर तुमच्या संपर्कात असतात.फोनवरून चौकशी करतात.खूपच जटील समस्या असेल तर जन्म कुंडली द्वारे मार्गदर्शन करतात. सरांच्या फी मध्ये वरील सर्व मार्गदर्शन अंतर्भूत असते. घर, फ्लॅट, ऑफिस, दुकान, सरकारी/औद्योगिक/सामाजिक/शैक्षणिक अशा विविध संस्थांच्या इमारती, हॉस्पिटल, भूखंड, शेती आणि शेत घर, फॅक्टरी, वर्क शॉप, भाडेतत्त्वाची घरे,पशुपालन, हॉटेल्स आणि लॉजिंग(वरील नियम लागू), कृषी पर्यटन केंद्र, गोडावून अशा आणि खाजगी तसेच सार्वजनिक मंदिरासाठी सुद्धा सर गेली सुमारे अठरा वर्षे मार्गदर्शन करीत आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र, बेळगाव आणि उत्तर कर्नाटक, गुजरातचा दक्षिण भागात सर मार्गदर्शनासाठी जातात. भारताबाहेर राहणाऱ्या लोकांना सर मार्गदर्शन करतात.(आमचे होम पेज वरचे global vaastu science नक्की वाचा. )
आपल्याला सरांचे वास्तू मार्गदर्शन हवे असल्यास आणि आपल्या मनात इतर काही प्रश्न असल्यास 9890569608 या मोबाईल नं वर संपर्क साधावा.
आर्किटेक्चरल कन्सल्टंट आणि बांधकाम व्यावसायिक
सर केवळ वास्तू कशी असावी हे सांगत नाहीत तर तशी बांधूनही देतात. आपण बऱ्याचदा अनुभवतो की एखादा वास्तू मार्गदर्शक घराचा आराखडा काढून देतो आणि असे बांधून घ्या असे सांगतो. तोच प्लॅन इंजिनिअर किंवा कॉन्ट्रॅक्टरला दिला की तो असे बांधता येणार नाही असे सांगतो.अशावेळेस वास्तू मालक गोंधळून जातो. सर म्हणतात की दोष वरील कोणाचाही नसतो. मात्र वास्तू शास्त्राचा अभ्यास करून वास्तू कशी असावी हे शिकणे आणि स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करून नियोजित वास्तू कशी बांधावी हे शिकणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. एक आहे शास्त्र तर दुसरे आहे तंत्रज्ञान. त्यामुळे जो वास्तू कशी असावी हे सांगतो त्यालाच ती बांधता सुद्धा यायला हवी. शिवाय वास्तू पूजन, मुहूर्त, चालीरीती, दैनंदिन जीवनातील आणि व्यवहारातील नियम, कौटुंबिक वर्तणूक शिवाय कुलाचार आणि पूजापाठ याची अचूक माहिती असेल तरच तो परिपूर्ण वास्तू मार्गदर्शक होय.
इंटेरिअर डेकोरेटर - घर,फ्लॅट किंवा व्यावसायिक स्वरूपाच्या वास्तूमध्ये अंतर्गत रचना हा अविभाज्य भाग आहे. जसा वास्तूच्या बांधकानाचा आराखडा असतो तसा वास्तूच्या अंतर्गत भागात कुठे काय असावे याचाही आराखडा असतो. फर्निचर, प्लांबिंग, इलेक्ट्रीसी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, रंगसंगती, किचन ओटा आणि ट्रॉलीज या सारख्या कामांसाठी सरांच्या हाताखाली तयार झालेली टीम आहे जी सरांच्या मार्गदर्शनानुसार रचना करून देते जी अर्थातच वास्तुशास्त्राला अनुसरून असते. सरांच्या कामातील इंटेरिअर डेकोरेशन हा भाग घर फक्त सुंदरच करणे असा नसून सुंदर घर वास्तू शास्त्रानुसार असावे हा आहे.वास्तू शास्त्राचा गाढा व्यासंग,आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेने अमित सर तुमची वास्तू सर्वांग सुंदर बनवतील यात शंका नाही.याविषयी अधिक माहिती आपल्याला आमच्या याच वेबसाईटवरील architecture consultancy यापेज वर मिळेल.
रत्न मार्गदर्शक - अमित सर जन्म कुंडलीद्वारेही मार्गदर्शन करतात.ज्यामध्ये ते धार्मिक उपाय आणि शुभ रत्न विषयावर मार्गदर्शन करतात.गेल्या दहाहून अधिक वर्षात अनेक व्यक्तींना याचा लाभ झाला आहे. सर फक्त रत्न मार्गदर्शन करत नाहीत तर रत्न विषयक त्यांचा गाढा अभ्यास आहे.अनुभव आहे. रत्न खाणीतून कसे काढले जाते, पैलू कसे पाडले जातात, इथपासून ते रत्न तपासणे, त्याची वर्गवारी करून किंमत ठरविणे, सर्टिफिकेट देणे आणि नकली रत्न ओळखून त्यापासून सावध राहणे यावरही सर मार्गदर्शन करतात. (याविषयी अधिक माहिती असणारे सरांचे पुस्तक आपल्याला याच वेबसाईटवर आमची प्रकाशित पुस्तके या पानावर मिळेल. )