कुटुंब समुपदेशन :-
समुपदेशन म्हणजे काय?
सम + उप + आदेश (आदेश - अत: + ईश) अशी प्राकृत मराठी संधीतून समुपदेशन हा शब्द तयार होतो. याचा अर्थ एखाद्याला उत्तम सल्ला देणे ज्याव्दारे समस्येला पर्याय निघेल व सर्वांचाच लाभ होईल.
कुटुंब समुपदेशनाची कार्य पध्दती कशी असते?
समुपदेशक व समस्येसंबंधीत व्यक्ती एकत्र बसून त्यांच्या समस्येवर चर्चा केली जाते. प्रथम समुपदेशक समस्या नीट ऎकून घेतो व आपल्या अनुभवाने, बुध्दीचातूर्याने, सदसदविवेक बुध्दीने यावर उपाय, पर्याय सांगून मार्गदर्शन करतो.
कोणकोणत्या समस्यांविषयी समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन करता येते?
लहान मुलांच्या समस्या, आर्थिक समस्या, कौटुंबिक समस्या, पती पत्नीमधील समस्या, वृध्द व्यक्तींच्या समस्या, शारिरीक व मानसिक आजारपणाच्या समस्यांवर मार्गदर्शन घेता येते. मृत्यूची भिती किंवा अपंग मूल अश्या काही विशिष्ठ समस्यांवरही मार्गदर्शन करता येते. वास्तुसाई कन्सल्टंसीमध्ये प्रत्येक समस्येवर समाधान आहे.
समुपदेशनानंतर किती काळात लाभ मिळतात?
अगदी लगेच. कारण विचार बदलून जातात. जगाकडे, स्वत:कडे आणि स्वत:च्या समस्येकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो. समस्या नेमकी का घडली, त्यातून बाहेर कसे पडता येईल याचा नीट विचार करता येतो. किरकोळ समस्या असेल तर १ - २ मिटिंग्जद्वारे, मोठी समस्या असेल तर ३ - ४ मिटिंग्जद्वारे लाभ मिळतो.
समुपदेशनाद्वारे नेमका फायदा कसा होतो?
समुपदेशकाकडे बरेच ज्ञान व अनुभव असतो. सकारात्मक दृष्टीकोन असतो. तुम्ही स्वत:कडे व तुमच्या समस्येकडे ज्या दृष्टीने पहाता त्याहून वेगळी दृष्टी त्याच्याकडे असते. शिवाय छोट्या छोट्या टिप्स मूळे भोवतालची स्थिती बदलता येईल अश्या टिप्स समुपदेशक तुम्हाला देतो. त्यामुळे तुमची मते, विचार, परिस्थीती आटोक्यात येते.
कुटुंब समुपदेशनाच्या टिप्स :-
समुपदेशन केसस्टडीज :-
वाचकहो "संसारसंगे बहु शिणलो मी, कृपा करी रे रघूराज स्वामी, प्रारब्ध माझे टळिता टळेना, तुजविणा रामा मज कंठवेना."
संसार, नित्य दैनंदिन कर्मे, व्याप अनुशंगाने येणार्या सांसारीक, प्रापंचिक समस्या कोणालाही चुकल्या नाहीत. अगदी राजा दशरथापासून ते एकवचनी, एकपत्नी, मातृ-पितृ भक्त रामरायालाही साक्षात श्रीरामालाही चुकल्या नाहीत तेथे सामान्यजणांचा काय पाड?
वास्तुसाईकडे दररोज अनेक समस्या, प्रश्न, संकटे यांचे निवारण करण्यासाठी अनेक लोक येत असतात व आपले समाधान करून घेतात. वास्तुसाईबद्दल आणखी एक आर्वजून सांगावेसे वाटते ते म्हणजे फक्त ज्योतिष बघणे असा एकच विषय नसुन कुटुंब समुपदेशनही त्याचप्रमाणे वैयक्तिक, विद्यार्थ्यांसाठी, टीनएर्जससाठी अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी केले जाते. त्या अनुशंगाने ही एक आणखी थोडीशी वेगळी केस सांगते.
एका शहरातील उच्चशिक्षणाची पदवी प्राप्त केलेल्या आय.टी. सेंटरमध्ये जॉब करीत असताना वर्षाला भलथोरल पॅकेज मिळवणार्या नवविवाहितेचा भेटीसाठी फोन आला होता. एक महीना आधीच तिने वेळ व तारीख कर्न्फम करून घेतली होती. नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे थोडीशी जबाबदारीत वाढ झाली होती. घरात सासु-सासरे, दीर-जाऊ त्यांची छोटी मुलगी व हे दोघे असे कुटूंब मोठ्या बंगल्यात वास्तव्याला होते. मोठी जाऊ घरचे संभाळून स्वतःचा व्यवसाय करीत होती. सासुबाई सासरे छान रीटायर्ड लाइफ एंजॉय करत होते. नवराही तिच्यासारख्याच मोठ्या आय.टी. कंपनीत नोकरीला होता, प्रमोशन ड्यू होते त्यामुळे यायच्या जायच्या वेळा अनियमित होत्या. ही नवीन असल्याने घरच्या लोकांचे तिच्याकडे जरा जास्त (कौतूकास्पद) लक्ष होते. पण घरातील कामांची नसलेली सवय, नवखेपणा, ऑफिस यात तिची चिडचिड वाढायला लागली. कुटूंबाने कधीतरी केलेली कॉफीची अपेक्षा तिला मोलकरीण आहोत की काय आपण? अशी वाटायला लागली. सगळ्यांकडे ती निगेटीव्ह भावनेने बघायला लागली, सासु-जावेने काळजीपोटी केलेले फोन - उशीर होणार आहे का? संभाळून ये हा दिलेला सल्ला तिला नॉनसेन्स, अडाणीपणाचा वाटू लागला, झोप येण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागल्या, अचानक डीप्रेशनचा झटका येऊन गेला आणि केवळ २७ वर्षांची ती स्वतःला ७२ ची वाटायला लागली.
त्या दरम्यान वास्तुसाईबद्दल तिला कळल्यावर ती पत्रीका घेऊन हजर झाली. गौरी मॅडमनी सखोल पत्रीका पाहून तिला दैवी उपाय दिलेच पण त्याहीपेक्षा तिच्या मनावर जमलेले काळे ढगही त्यांनी दूर केले. लहानपणापासुन ते लग्नानंतर जगलेल्या आयुष्याचा लेखाजोगा तिने त्यांना सांगितला खूप रडली पण मनही स्वच्छ झाल केवळ मॅडमनी तिला माणसाचा मिळालेला जन्म किती पुण्याईचा आणि महत्वाचा आहे हे सांगितलेच त्याबरोबर रोजच्या जीवनातील काही साधक-बाधक युक्त्या, टीपही दिल्या. तुच्या जगण्याचा अर्थच बदलला नव्हे जीवनाकडे, कुटूंबाकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आणि मग? मग काय विचारता ज्याचा शेवट गोड ते सगळेच गोड झाले हे सांगयलाच नको.
>>
वास्तुसाईविषयी माहिती करुन घेणारे, आपल्या पत्रीकांचा बरा-वाईट काळ, संपत्ती, संतती आदीविषयी अगोदरच माहिती करुन घेणार्यांची संख्याही वाढत आहे. अगदी उच्चशिक्षीत सुशिक्षीत तरुण-तरुणीही यात अग्रेसर आहेत; यांची सर्वांची संख्या वाढत आहे याचा वास्तुसाईची पी.आर.ओ. म्हणून मला रास्त अभिमान आहेच व या तरुणाईच कौतुकही. कारण सगळ व्यवस्थित प्लॅन करण्यामागे या सार्यांचा काही ना काही उद्देश असेलच.
उदाहरण द्यायचच झाल तर एका होतकरु तरुण डॉक्टर व त्यांची सहचारिणी तरुणी डॉक्टर यांनी लग्नापूर्वीचे गुणमेलन तर केलेच; तसच क्लिनीकच्या जागेचे नकाशे, आराखडे, त्यांच्या नवीन घराचे आराखडे इतकच काय भविष्यातील उच्च शिक्षण व प्रॅक्टीस यासंबधीही मार्गदर्शन घेतले.
सांगायचे तात्पर्य एवढेच की, आज २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असतानाही वैज्ञानीक दृष्टीकोनातून ग्रह, तारे, चुंबकीय उर्जा, दिशा या सर्वांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे. आणि वास्तुसाईचा प्रवासही अशाच वैज्ञानिक, शास्त्रीय पण परमेश्वरी वरदहस्त असलेल्या रस्त्यावरुनच चाललेला आहे. तो असाच चालत राहो ही ईश्वराकडे विनंती.
>>
वास्तुसाईचे काही नियम आहेत पण ते नियम आपणा सर्वांच्या फायद्यासाठीच आहेत. उदा. अपॉईंटमेंट घेणे. फोन करून वेळ ठरवली तर ती सर्वांच्या सोयीची ठरते. वेळ ठरवून फोनवर किती पत्रीका आहेत, कोणत्या संदर्भात भेटायचे आहे हे मोकळेपणाने सांगितल्यास आपणा सर्वांचाच वेळ सत्कारणी लागतो हा अनेकजणांप्रमाणेच माझाही अनुभव !
पी. आर. ओ. या नात्याने एकदा एका भगिनींचा फोन आला त्यांना मॅडमना भेटायचे होते. नोकरी न करणार्या पण जबाबदार सुगृहिणीच होती. दोन मुली, नवरा, सासुबाई, सासरे असे कुटूंब होते. जबाबदार्या असल्याकारणाने शक्यातो शाळेत मुली गेल्यावरती वेळ त्यांना हवी होती तशी मिळालीही !
त्यांना त्यांच्या पत्रिकेत मुलाचा योग आहे का हे विचारायचे होते त्याचप्रमाणे त्यांना दोन्ही मुलींच्या वेळेस प्रसुती (डिलेव्हरी) च्या वेळेस खुप त्रास झाला होता म्हणून त्या साशंक होत्या.
ठरलेल्या वेळी गौरी मॅडम व त्या गृहिणीची भेट झाली मॅडमनी तिच्या पत्रीकेबरोबरच पती व मुलींची पत्रीकाही पाहिली व मुलाचा योग आहे असे सांगितले. अर्थात असे असले तरी १००% देवावर विश्वास ठेवा शेवटी नशिबात असेल ते होईल अस मॅडम म्हणाल्या ! त्याचबरोबर मॅडमनी काही दैवी उपासनाही त्या गृहिणीला दिली व त्याचबरोबर मॅडमनी सुलभ प्रसुती व आरोग्यदायी व सुदृढ बाळासाठी आपले "आध्यात्मिक गर्भसंस्कार" हे पुस्तकही दिले. त्या स्त्रीनेही ते उपाय व पुस्तकातील माहीतीचा उपयोग केला व यथावकाश अतिशय उत्तम मुर्हूतावर ती स्त्री सुलभ व सुखरूप प्रसुत झाली. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तिला मुलगाच झाला.
इतर सर्व छान होऊनही बाळाला घेऊन भेटायला आल्यावर त्या स्त्रीने मॅडमचे जेव्हा आभार मानले तेव्हा गौरी मॅडम म्हणाल्या अहो मी काहीच केल नाही; केवळ ईश्वर व साईबाबा तसेच तुमचे योग यामुळेच सर्वकाही झाले.