आमची प्रकाशीत पुस्तके :-
तेजोगमन
एका अलौकिक शक्तीच्या परतीच्या प्रवासाची आणि या शक्तीला जन्म देण्यासाठी निवडल्या गेलेल्या एका जोडप्याची कथा...
ब्रह्मलोकातील एका देवदूताला नियम मोडल्यामुळे हद्दपार केले गेले आणि पुन्हा परत येण्यासाठी अट ठेवली गेली. त्याने सर्व अटी मान्य करून या प्रेमी जोडप्याच्या पोटी जन्म घेऊन ब्रह्मलोकात पुन्हा प्रवेश घेण्याची परवानगी मिळवली.... पण गेला का तो तिकडे???
सौ.गौरी अमित काटे यांनी लिहिलेली सर्वांग सुंदर विलक्षण प्रेमकथा.... तेजोगमन!
वाटाड्या
श्रम, कष्ट, परोपकार आणिआईवडिलांनाच देव मानणाऱ्या शरदच्या शुद्ध अंतःकरणावर खुश होऊन परमेश्वर त्याची एका वेगळ्या कार्यासाठी निवड करतो...
ही जाणीव होऊ लागते तेव्हा शरद गोंधळून जातो, एक वेगळीच दुनिया त्याला जिवंत असताना दिसू लागते.
कसा समन्वय साधतो तो या आणि दुसऱ्या दुनियेचा?
त्याचा देवावर विश्वास बसतो का? त्याला देव दिसतो का? कसा आहे परमेश्वर आणि कशी आहे 'ती' दुनिया?
गौरीताईंनी (पूर्वाश्रमीच्या प्रिया धामापूरकर) या कादंबरीतून उलगडले परमेश्वराचे रूप...
नक्की वाचा, 'वाटाड्या'
आध्यात्मिक गर्भसंस्कार आणि गर्भ जोपासना
अध्यात्म,ध्यान यांचा लाभ सगळ्यांना होतो.अगदी पोटातल्या बाळालाही! गौरीताईंनी या माहितीपूर्ण पुस्तकातून त्यांच्या अभ्यासाचे सार लिहिले आहे. गर्भवती स्त्रियांना आणि त्यांच्या बाळाला उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तकात -
सर्व माहितीचे विवरण अतिशय सोप्या शब्दांत आणि सहज कुणालाही जमेल अशा पध्दतीने दिली आहे ही या पुस्तकाची खासियत आहे.
श्री कालभैरव महात्म्य
कालभैरव म्हणजे अनेक गावांचे दैवत. त्याची माहिती मात्र फार कमी लोकांना आहे. कालभैरव कुणाचे रूप आहे, तो कसा प्रगट झाला? त्याचे कार्य काय? त्याचे वाहन काय? अनेक गावांचे कुळांचे हाच दैवत का?त्याची पूजा कशी करावी? काय करावे, काय करू नये? अशी परिपूर्ण माहिती गौरीताईंनी या पुस्तकात लिहिली आहे.
महारत्ने: दैवी शक्तीचा ऊर्जास्रोत
रत्नमार्गदर्शक आणि विश्लेषक श्री.अमित काटे सरांची अनेक वर्षांची मेहनत,अभ्यास आणि अनुभव म्हणजे हे पुस्तक होय.
याच्या बॅकपेजवर यातील प्रकरणे आहेत. जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या छोट्याशा पुस्तकात सर्व प्रचंड माहिती किती ठासून भरली आहे.