फलज्योतिषशास्त्र:-


फलज्योतिषशास्त्र म्हणजे नेमके काय?

जन्म होताना त्या ठिकणी आकाशात कोणते ग्रह कोण्त्या पद्धतीने आहेत यांचा तक्ता म्हणजे आपली जन्मकुंडली. या ग्रहांमधून निघणाया विद्युत चुंबकीय शक्‍तींचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे कुंडलीतील विविध स्थानांनुसार आपल्या जीवनावरती चांगले वाईट परिणाम होतात. याची अचूक माहिती देणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिषशास्त्र होय.

 

या शास्‍त्राचा सल्ला का घ्यावा?

आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला फलज्योतिषशास्त्रामुळे अगोदर कळू शकतात. साहाजिकच सावधानता बाळगण्यासाठी जीवनाचा योग्य मार्ग निवडण्यासाठी जे नशिबात नाही त्याच्या मागे धावून होणारे आपले नुकसान टाळण्यासाठी या शास्त्राचा सल्ला घ्यावा. या शास्त्रामुळे आपल्याला अचुक निर्णय क्षमतेची शक्‍ती मिळते. आयुष्यातील विविध टप्यांवर येणारे खाचखळगे वेळीच ओळ्खून पुढील आयुष्याच्या टप्प्यांवर यशस्वी होण्याची ताकद हे शास्त्रच आपल्याला देते.


याच्या उपाययोजना कशा असतात?

प्रत्येक ग्रहाच्या उपास्त देवता आहेत. मंगळ - गणपती, शुक्र - विष्णू लक्ष्मी, गुरू - दत्तगुरू, साई, शनि - राम व मारूती इत्यादी. इच्यापूर्तीमध्ये ग्रहदशा आड येत असल्यास या देवतांच्या पूजनाने संबंधित दोष नष्ट होतात. याचप्रमाणे काही बहुमुल्य व गुणकारी वस्तूंच्या वापराने पूजन केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते. अंगी शक्‍ती येते. बुद्‍धीतेज वाधते. सर्व सुखांची प्राप्ती होते. काही तिथी, नक्षत्र भाग्योदय करणारी असतात. त्यादिवशी पूजापाठ केल्याने, ग्रहशांती, दानधर्म, जप केल्याने जीवनातील अनेक समस्या नष्ट होतात.


कोणकोणत्या विषयावर हे शास्‍त्र मदत करते?

आरोग्य, स्वभाव, शिक्षण, वाचा, बुध्दी, स्थैर्य, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, भाग्योदय, प्रॉपर्टी, परदेशगमन, पदप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, मोक्षप्राप्ती यासाठी हे शास्त्र मार्गदर्शन व उपासना सुचवते. ह्याने लाभ तर घडतोच शिवाय कष्टही कमी होतात. फलज्योतिषशास्त्राचा शोध यासाठीच लगलेला आहे की आपण स्वत:ला नीट जाणून घ्यावे आणि कष्ट, समस्या, वाईट, योग्य यांचा सामना करता यावा, त्यांना नष्ट करता यावे.

 

आपल्याला काही समस्या असल्यास :
वरील विषयांशी संबंधित कोणत्याही शंका किंवा समस्या असल्यास आपण आमच्याशी थेट संपर्क साधू शकता. आपल्या समस्येच्या निवारणार्थ आम्ही आमच्याकडील योग्य उपाय आपणास देऊ ज्यामुळे आपली समस्या दूर होईल.

 

यासाठी आपण आपली संपूर्ण जन्मकुंडली काढून घेऊ शकता. ज्याद्वारे येणारा काळ कसा आहे, त्यामधे काही समस्या आहेत का, त्यासाठीचे उपाय, शुभरत्न आणि वर्तना संबंधीच्या सुचना आम्हाला आपल्याला करता येतील. या जन्मकुंडलीमधे साडेसाती, शिक्षण, आरोग्य, विवाह, आजार इतकेच नव्हे तर मृत्यूयोग कधी व कसा असेल, अपमृत्यूयोग असल्यास त्याचे निवारण करण्यासाठी उपाय दिलेले असतात.

 

 

फलज्योतिषशास्‍त्राच्या टिप्स :-

 

  1. आपल्या जन्मलग्न कुंडलीमध्ये प्रथमस्थानी जो ग्रह किंवा राशी असते त्या देवतेची उपासना जातकाला (त्या व्यक्‍तीला) जास्त फलदायी असते.
  2. पापग्रहांची रत्ने वापरण्याऎवजी शुभग्रहांची रत्ने वापरावीत. ती जास्त लाभदायक ठरतात.
  3. अष्टमात चंद्र असणारा माणूस जास्त भित्रा असतो तसेच त्याला स्‍त्रीया, पाणी यापासून धोका असतो.
  4. प्रथम व सप्तमस्थानी राहू-केतू असणार्‍या स्‍त्रीयांना गायत्री मंत्राची उपासना अत्यंत लाभदायक ठरते.
  5. गूणमेलन न करता विवाह केला असेल किंवा कमी गूण जूळून विवाह केला असेल व त्यामूळे पती-पत्‍नींमध्ये वाद होत असतील तर कुलदेवतेची पूजा दोघांनी मिळून करावी. यामूळे वाद कमी होतील.
  6. ग्रह बळ कमी असल्यास त्या-त्या ग्रहांचा जप करावा असे शास्‍त्र म्हणते. हा जप ब्राम्हणाकडून किंवा भटजींकडून घेण्या ऎवजी स्वत: रोज थोडा-थोडा करणे जास्त लाभदायक असते.
  7. मनोभावे रोज न चूकता सातत्याने, सहामहीने गणपती स्‍त्रोत्र सकाळ-संध्याकाळ म्हटल्यास मनोवांछीत पूर्ण होते.
  8. जो ग्रह नीचीचा किंवा निर्बली असेल त्याच्या वारी काळ्या रंगाचे कपडे वापरू नयेत.

  9. भावी पिढी, संतती किंवा गर्भधारणा यासंबंधी एखाद्‍या घराण्यात सतत समस्या भेडसावणे पितृदोषाचे कारण असू शकते. यासाठी शिवउपासना लाभप्रद ठरते.
  10. शुक्र-मंगळ, शुक्र-शनी, शुक्र-रवी अशी यूती असणार्‍या जातकांनी त्यांचा शुक्र बलवान, मार्गी असेल तर हिरा रत्न कधीही वापरू नये.