Architecture Consultancy :-
आर्किटेक्चरल कन्सल्टन्सी(स्थापत्यशास्त्र म्हणजे वास्तू बांधणीविषयक सल्ला मार्गदर्शन)
अमित सर म्हणतात की उत्तम वास्तू बांधायची असेल तर जागा निवडण्यापासूनच मार्गदर्शन घ्यावे.
जर जागा घेतली असेल तर तिथे बांधकाम करण्यापूर्वीच जागा तपासून घ्यावी. जागेतील स्पंदने आणि दोष असतील तर त्यावर उपाय यावर सरांची मास्टरी आहे.उपाय अतिशय साधे, सोपे तरीही प्रभावी असतात.यानंतर प्लॅन बनविला जातो.
नियोजित वास्तूचा किंवा आराखडा/प्लॅन, 2D/3D एलिवेशन, वॉक थ्रू, rcc प्लॅन, अंतर्गत रचना (इंटेरिअर प्लॅन वास्तुशास्त्रानुसार सर्व रचना) जी इच्छा आणि गरज असेल तसा कोणताही प्लॅन वास्तुशास्त्रानुसार बनविता येतो.
एखाद्या जागेवर काय उभारले तर यश येईल यासाठी सर विशेष मार्गदर्शन करतात.
भूमिपूजन झाले की बांधकाम सुरू होते.यादरम्यान सर महत्वाचे मुहूर्त देतात.वास्तूचे बांधकाम विना अडथळे सुखरूप पूर्ण व्हावे यासाठी सर जागरुक असतात.
जो इंटेरिअर प्लॅन अमिटसर देतात तो तर वास्तुशास्त्राधार असतोच शिवाय त्या प्लॅननुसार अंतर्गत सजावट interior decorations अमित सर करतात. लाकूडातील सर्व प्रकार आणि मारबल डेकोरेशन ही सरांची खासियत आहे. तुम्हाला जे हवं ते या पद्धतीने सर आणि त्यांची टीम अतिशय सुंदर रचना करते. अगदी आधुनिक तंत्रज्ञान वापरून, सिपोरेक्स म्युरल सुद्धा बनविले जातात.घरातील किंवा फ्लॅटमधील आपल्या एका वॉलवर असलेली ही शोभा घराचे वातावरण बदलून टाकते.
सरांचे काम इतक्यावरच थांबत नाही. अंतर्गत रचना करत असताना वास्तूमधे असणारी प्रभावी शक्ती म्हणजे वास्तुदेवता! तिचे विधिवत निक्षेपण आणि दैनंदिन जीवनात करायचे उपाय जेणेकरून आपल्या वास्तूतील शुभाऊर्जा बाहेर जाऊ नये आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा आत येऊ नये यासाठी काय करावे लागते याबद्दल सर मार्गदर्शन करतात.
कोणतीही वास्तू मग ते मंदिर असो किंवा व्यवसायाची जागा, घर असो व अपार्टमेंट कॉलोनी, रो हाऊसेस असोत व संपूर्ण प्रकल्प, अमित सर अत्यंत सुंदर, शास्त्रोक्त आणि सुनियोजित आराखडा देतात.