आमचे उपक्रम :-
वास्तूसाई कंसल्टंसी परीवारातर्फे सतत नाविन्यपूर्ण उपक्रम लोकसेवा आणि जनजागृतीच्या उद्देशाने चालू असतात. अंधश्रध्देचे आणि शंकांचे निरमन व्हावे व आपल्यातील दडलेल्या सुप्त शक्ती, उर्जा यांना जागृती मिळावी यासाठी गेली दहा वर्षाहून अधिक काळ आम्ही विविध उपक्रम घेतो. आमचे काही विषेष उपक्रम.
१. वृध्द व्यक्तींच्या मनातील मृत्यू, दिर्घ व्याधी यांची भिती दूर करून वृध्दापकाळ आनंदी जाण्यासाठी शिबिरे घेतली. उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि उत्तम अनुभव आमच्या वृध्द शिशूंना आला !
२. गर्भवती स्त्रीयांसाठी ध्यानधारणा शिबिर घेतले. यामधे प्रथम सुवर्ण प्राशनाचे महत्व सांगितले आणि ग्रहणकाळ, सिझरीन प्रसुती, बाळाची जन्मकुंडली व शांती कर्मांची आवश्यकता अश्या त्यांच्या विविधांगी प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरे देवून शंकानिरसन केले.
३. सौंदर्यस्पर्धेतील मुलींना ध्यानधारणा, स्टेज डेअरिंग आणि आपले व्यक्तीमत्व प्रेक्षकांसमोर शाही पध्दतीने कसे सादर करायचे तसेच ज्यूरींच्या तत्वनिष्ठ पण गोंधळात टाकणार्या प्रश्नांना कशी उत्तर द्यायची याविषयी मार्गदर्शन केले. याचा अतिशय सुंदर व प्रभावी परीणाम झाला त्यामूळे हे कार्य सलग ३ वर्षे केले.
४. सर्वांसाठी ध्यानधारणा शिबिराचे आयोजन केले. वय वर्षे ५ ते ९५ अशी दिर्घ व्यापकता ठेवली. नाडीशुध्दी व बैठक, ॐ कार, प्राणायाम आणि चित्तशुध्दीसाठी आहार मार्गदर्शन केले.
५. मंगळ ग्रहाची अनाशयी भिती, विवाह आणि मंगळ यांचा परस्पर संबंध काय याविषयी मार्गदर्शन शिबिर घेतले. यावेळी सहभागार्थींची मोफत कुंडली काढून दिली. तर कुंडलीतील मंगळ ग्रहाच्या बैठकी विषयी वैयक्तीक मोफत मार्गदर्शन केले. त्यांच्या कुंडलीतील मंगळ कडक आहे की सौम्य, की नाहीच आहे आणि त्याचे फायदे व तोटे समजावून तोटे असल्यास उपाय सुध्दा दिले.
६. श्री गायत्री उपासना शिबिर सर्व स्त्रीयांसाठी घेतले. गायत्रीमंत्र सर्वांसाठी असून सर्व स्त्रीयांनाही लाभदायक आहे याविषयी मार्गदर्शन केले.
७. गृह, गृहीणी आणि स्वयंपाकगृह असे सर्व स्त्रीयांसाठी वास्तुशास्त्र नियम विषयक शिबिर घेतले. याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
८. वास्तू व ज्योतिष ही दोन्ही शास्त्रे एकाच उगमातून आहेत. या विषयी शंकानिरसन करणारे मार्गदर्शनपर शिबिर व चर्चासत्राचे आयोजन केले.
९. मुले आणि पालक सुसंवाद याविषयी प्रश्नोत्तरे व चर्चासत्र शिबिर घेतले.
10. रक्तगट आणि गुणमेलन यांविषयी गैरसमज दूर करणारे शिबीर घेतले.यावेळी किमान पाचशे मुला-मुलींचे रक्तगट तपासले.
11. वास्तूशास्त्राबद्दल गैरसमज दूर करणारे शिबीर घेतले.खरे वास्तू शास्त्र म्हणजे भिंतीवर लावायच्या वस्तू नसून खऱ्या वास्तुशास्त्राचा पाया दैवी आहे.
12. याच्या दुसऱ्याच दिवशी विविध धर्मियांना वास्तूशास्त्र कसे मार्गदर्शन करते आणि दोष निवारणासाठी उपाय त्या त्या धर्माशी निगडित कोणते उपाय केले जातात यावर शिबीर संपन्न झाले.
13. आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअरना vaastu science for interior शिकविले.
14. नवीन पिढीला प्राचीन शास्त्रे आणि नियम वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगितले.शंभर हुन अधिक तरुण मुली-मुले यात सहभागी झाले होते.
15. लोकांच्या माहितीसाठी you tube चॅनेल सुरू केले. (YouTube Channel Link)
अत्ता पर्यंत घेतलेली ही विषेष व उल्लेखनिय शिबिर असून यापूढेही घेवूच. अशा पध्दतीने जनजागृती आणि योग्य शास्त्रोक्त माहीतीचा प्रसार आम्ही करूच. आपल्या काही सूचना असल्यास, आगामी शिबिरांमध्ये सहभागी होण्याची, वॉलेंटीअर म्हणून आमच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्यास जरूर कळवावे.